मुंबई, वृत्तसंस्था : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती.
अनेक सामान्य ग्राहकांना सण-उत्सव, लग्न-समारंभाच्या निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी खिसा मोठ्या प्रमाणावर रिकामा करावा लागत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी सध्या सोन्याचा भाव १२ हजारांनी स्वस्त आहे.


