Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कलिंगड विक्रेत्याच्या मुलीचा विनयभंग, वाळू व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
March 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जळगाव, (प्रतिनिधी) – कलिंगड विक्रेत्याच्या मुलीवर विनयभंग व दमदाटी केल्याप्रकरणी वाळू व्यवसायिकांविरुद्ध नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतातील कलींगड तोडण्यास विरोध केल्याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. वाळू व्यावसायिक बाळ, विठ्ठल पाटील व सुपडु सोनवणे असे नाव आहे. दुपारी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास सुनसगाव रस्त्यावरील शेतानजीक एक शेतकरी आपल्या अल्पवयीन मुलीसह कलींगड विक्री करण्यासाठी उभा होता. त्यावेळी चारचाकीने जात असलेले तिघे जण खाली उतरले. त्यांनी कलींगड विक्रेत्या शेतक-याकडे मोठ्या कलींगडाची मागणी केली.

आपल्याकडे मोठ्या आकाराचे कलींगड नसल्याचे सांगितले असतांना देखील त्यांनी बळजबरीने शेतातील मोठ्या आकाराचे 9 कलींगड तोडले. या कलींगडाचे आठशे रुपये मागीतले असता तिघांना राग आला. त्यांनी कलींगडाची रक्कम देण्यास शेतक-यास नकार दिला. त्यामुळे शेतक-याने ते कलींगड त्यांच्याकडून परत घेतले. संतप्त झालेल्या तिघा जणांनी कलींगड विक्रेत्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण करत छातीत लाथ मारली.

यावेळी शेतक-याची सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी हजर होती. तिच्या मनाला या घटनेमुळे वेदना झाल्या. दरम्यान त्यातील एका जणाने मुलीला बघून हातवारे करत अश्लील वर्तन केले. त्यानंतर सर्वजण त्यांच्या ताब्यातील वाहनाने निघून गेले. त्यावेळी शेतातील दोघा जणांनी त्या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. एकाने त्यांना अडवून शेताजवळ पकडले. शेतक-याच्या एका सहकाऱ्याने त्या लोकांना ओळखले. त्यांची नावे बाळू चाटे, विठ्ठल पाटील व सुपडु सोनवणे असल्याचे कलींगड विक्रेत्या शेतक-यास समजले असता याप्रकरणी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलिस स्टेशनला कलींगड विक्रेत्याच्या फिर्यादीनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हा भा.द.वि. 354(अ), 447, 323, 504, 506 तसेच बाल लैंगीक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नि. साळुंखे करत आहेत.

वाळू व्यावसायिक विठ्ठल पाटील यांच्याशी संपर्क करुन माहिती घेतली असता ते म्हणाले की त्या ठिकाणी आम्ही कलिंगड घ्यायला थांबलो, विक्रीला असलेले कलिंगड लहान होते म्हणून आम्ही मोठे कलिंगड मागितले विक्रेत्याच्या मजुरानेचं शेतातून मोठ्या आकाराचे कलिंगड तोडून दिले. त्यानंतर विक्रेत्याने भाव जादा सांगितले म्हणून विचारणा केली असता त्यांनीच कलिंगड हिसाकावून घेतले त्यानंतर आम्ही फक्त अशी पद्धत असते का अशी विचारणा केली. त्या ठिकाणी कुठलाही वाद झाला नाही.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsकलिंगड विक्रेत्याच्या मुलीचा विनयभंगवाळू व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, २९ मार्च २०२१

Next Post

मोठी घसरण; आता सोने प्रति तोळा १२ हजार रुपयांनी झाले कमी

Next Post
सोने - चांदीचा दर, आज कोणत्या दराचा व्यवसाय सुरू झाला ते जाणून घ्या

मोठी घसरण; आता सोने प्रति तोळा १२ हजार रुपयांनी झाले कमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group