जळगाव प्रतिनिधी । माहेरी आलेल्या विवाहितेचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणपती नगरातील गौरी हीतेश चव्हाण यांचा विवाह नवापुर तालुक्यातील पानबारा येथील हितेश राजेंद्र चव्हाण यांच्याशी ऑक्टोबर 2015 मध्ये झाला आहे. पती हितेश याचे परस्त्रीशी संबंध असल्याची माहिती विवाहितेला समजली. याचा तिला विचारले असता पतीने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. राजेंद्र चव्हाण राजेंद्र देवराम चव्हाण, मंगलाबाई चौधरी सर्व राहणार पानबारा ता. नवापूर जि. नंदुरबार यांनीही पतीला पाठबळ दिले व त्यांनी अंगातील श्रीधन काढून घेतले. हा प्रकार असह्य विवाहिता माय जळगाव येथील माहेरी निघून आल्या.
फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहेत.