Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सातपुडा पट्ट्यात होतेय मोठ्या प्रमाणात मधाची निर्मिती(व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
March 28, 2021
in आरोग्य, जळगाव
0
सातपुडा पट्ट्यात होतेय मोठ्या प्रमाणात मधाची निर्मिती(व्हिडिओ)

जळगाव (तुषार वाघुळदे )-जीव धोक्यात घालून भिल्ल , आदिवासी, पावरा आणि वडर समाज पोटाची खळगी भरण्यासाठी रानात वणवण फिरून मध गोळा करण्याचे काम काही जण करीत आहेत. मधाचे पोळे शोधत शोधत अलगदपणे ते पोळे काढले जाते , खाली पडू न देता फांदी हळुवारपणे कापून मधाचे पोळे गोळा करून आणि ते पोळे निपवून मध काढले जाते.
जयराज भिल्ल हा तरुण गेल्या 12 वर्षांपासून मधाचे पोळे काढून ते बाजारात विक्री करीत आहे.मार्च ते जून महिन्यात मध मोठ्या प्रमाणात हाती लागते असे त्याने सांगितले.
खान्देशातील सातपुडा पट्ट्यात जळगाव जिल्हा येतो. जिल्ह्यातील जामनेर , रावेर , यावल ,मुक्ताईनगर ,चोपडा तसेच आदी परिसरात जंगल सदृश्य परिस्थिती आहे.
साधे मोहोळ , आगे मोहोळ असे मधमाशाचे प्रकार असून सध्या शहरातील विविध इमारतीवर मधाचे पोळे तसेच रानात विविध झाडांवर मधाचे पोळे दिसून येत आहेत. काही लोक धुराळा करून तर काही जण विशिष्ट केमिकलची फवारणी करून मध गोळा करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतू मधमाशांचे आणि अंडीचे नुकसान न होता मधमाशांचे संवर्धन व्हावे याचा प्रयत्न जास्त होताना दिसत नाही.गावठी पद्धतीने मध गोळा करण्याचे प्रकार दृष्टीक्षेपात पडतात. जयराज म्हणाला की , ज्या फांदीवर मधाचे पोळे असते ती फांदी हळुवारपणे मी तोडतो आणि बादलीत ते पोळे जमा करीत असतो , पोळ्यावरील राणीमाशी पकडून इतर पोळे गोळा करतो आणि घरी आणून मधाचे पोळे निपवून मधाचे संकलन करीत असतो असे त्याने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ग्राहकांना अडीचशे ते तीनशे रुपये किलोप्रमाणे मधाची विक्री करतो. त्यासाठी मी सकाळी 9 वाजता घराबाहेर पडतो. रानात फिरतो ,दिवस ढळतो ,तेव्हा कुठे मधाचे पोळे दिसते , मात्र रोज एकतरी मधाचे पोळे शोधतो आणि तोडून आणतो , एका पोळ्यापासून 3 ते साडेतीन किलो मध निघते आणि दिवसाला सातशे ते आठशे रुपये मिळतात , त्यावर माझे मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो असेही तो म्हणाला. मधाच्या पोळ्यापासून जे मेण निघते ते व्यापाऱ्याला पाचशे किलोप्रमाणे विकतो असे त्याने सांगितले. मुंबई ,अहमदाबाद भागात मेण पाठविले जाते.
काही पेष्ट कंट्रोल करणारी मंडळी आग पेटवून या मधमाशांना अक्षरशः जाळून टाकतात .या मधमाशांना पळवून लावू नका,त्यांना जपण्याची खूप गरज आहे. त्यांच्याकडचा मध अवश्य चाखा. मधमाशांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. मधमाशी रानांत फिरफिरते आणि फुलांवरील पराग कण चाखते आणि मधाची निर्मिती होत असते.
मध हे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे, याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे.
मधाचे फायदे याप्रमाणे आहेत.
1) मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.

२) कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.

३) उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.

४) रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.
५) हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.
६) रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
7) मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.
८) उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.
९) पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.
१०) चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.
११) रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
१२) मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.
१३) टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.
१४) मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.
१५) मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

Share post
Tags: #Honeydivya newsJalgaon newsMarathi Newsमधाची निर्मिती
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २८ मार्च २०२१

Next Post

माहेरी असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ, गुन्हा दाखल

Next Post
हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ, नऊ जणांवर गुन्हा

माहेरी असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group