जळगाव प्रतिनिधी । संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकार्याला चक्क खुर्चीला बांधल्याने खळबळ उडाली आहे.चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून आज वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात धडक दिली आहे.
याप्रसंगी त्यांनी रूद्रावतार धारण करत अधिकार्यांची खरडपट्टी काढली. याप्रसंगी त्यांच्या सोबत अनेक शेतकर्यांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र अधिकार्यांनी आपण कार्यवाही करत असल्याचे उत्तर दिले.तालुक्यातून साज हजार वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दलही त्यांनी जाब विचारला. यामुळे संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी चक्क अधिकार्यांनाच खुर्चीला बांधले. यानंतर त्यांना चपलांचा हार घालण्याची तयारी देखील करण्यात आली.
यामुळे खळबळ उडाली असून वीज वितरण कंपनीच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्मित झाले आहे.