चोपडा – कोरोना बधितांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ व्हायरल होण्यापासून थांबवा अशी विनंती करणारं पत्र कोरोना संसर्ग झालेल्या पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी चोपडा तहसीलदारांना व्हाट्सअप वर पाठवले आहे .
चोपडा तालुक्यातील कोरोनाच्या पेशंट ची संख्या वाढत आहे,त्यातल्या त्यात तरुण कुटुंब प्रमुख पुरुष महिला ह्या दुर्देवी मृत्यु पावत आहेत आणि सर्वतोपरी राजकीय, सामाजिक, आरोग्य विभाग,प्रशासनाच्या वतीने भरपूर प्रयत्न केले जात आहेत.पण घराघरात कोरोनाग्रस्त लोक आहेत कोणी हॉस्पिटल्स ला तर कोणी होम क्वारंटाइन आहेत, जो तो त्याच्या परिने जीव वाचविण्यासाठी जीवांचा आटा पीटा करीत आहे.
पण मला एक अतिमहत्वपूर्ण सांगावेसे वाटते की माझ्या घरात ही लहान चिमुकल्या सहित सर्व आम्ही कोरोना ग्रस्त आहोत, म्हणून सर्वत्र जे चित्र आपण व्हाट्सएप, इंस्टाग्राम, फेसबुक, आणि स्टेटस,आणि सोशल मीडिया वर चोपडा येथील,जे रुग्ण मरण पावत आहेत,त्यांचे फ़ोटो,त्यांचे व्हिडीओ त्यात अंत्यविधीचे, अमरधाम येथे त्यांचे शव जाळताना चां व्हिडीओ वारंवार काही लोक दाखवत आहेत ते थांबवण्यात यावा. अशी विनंतीचे पत्र चोपडा तहसीलदारांना व्हाट्सअप वर पाठवले असल्याची माहिती देण्यात आली.