जळगाव – शहरातील निवडुकीच्यावेळी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला साथ दिली आहे. फुटीर नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजप सभागृह नेते ललित कोल्हे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
जळगाव महापालिका पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतासह सर्वांची भाजपात घुसमट होत असल्याचा मुद्दा मांडला आहे. आमच्या हाती सत्ता आल्यानंतर जळगाव शहराचा विकास होणार असून पुढे धुळे, मालेगाव, नाशिकचा देखील होऊ शकतो. आमदार राजूमामा भोळे यांनी नगरसवेकांसह ठेकेदारांना कामे देतांना भेदभाव केला, कुणाला कामे द्यावी हे अगोदरच ठरले जात होते. भाजपाचे आम्ही सर्व २७ नगरसेवक बाहेर पडलो ते केवळ आमदार राजुमामा भोळे यांच्यामुळेच. त्यांना इतरांना कुणालाही मोठे होऊ द्यायचे नव्हते. गेल्या महिन्यात देखील आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यालयावर काही नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. आमदार भोळे यांनी माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीष महाजन यांना नेहमी चुकीची माहिती दिली, त्यामुळेच गटतट निर्माण झाले असेही नगसेवक ललित कोल्हे यांनी सांगितले.