Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्वीकारला पदभार (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
March 22, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्वीकारला पदभार (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अधिकृतपणे आपापल्या पदांचा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत कार्यभार सांभाळला.

साधारणपणे अकरा वाजेच्या सुमारास शिवसेना पदाधिकारी यांच्यावतीने महापौर आणि उपमहापौर यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. या दोन्ही मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आरती केली. यानंतर सतराव्या मजल्यावर दोन्ही मान्यवरांनी आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला.

नुकत्याच झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी दणदणीत विजय संपादन केला. मूळच्या शिवसेनेच्या गटाला भाजपमधील फुटीर गट आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान केल्यामुळे भाजपला पहिल्यांदाचा महापालिकेवर एकहाती सत्ता मिळाली आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्थापनेला १८ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचीत्य साधून आज नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौर यांनी सतराव्या मजल्यावरील कार्यालयात आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला.

महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या पदांचा कार्यभार सांभाळण्याआधीच शिवसैनिकांनी परिसरात जय्यत तयारी करून ठेवली होती. काल सायंकाळपासूनच परिसर भगव्या रंगात रंगल्याचे दिसून आले. या भागात ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि नूतन महापौर व उपमहापौरांच्या स्वागतांचे फलक दिसून आले.

याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर ललीत कोल्हे, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे, इब्राहिम पटेल, अमर जैन, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे, महिला आघाडीच्या शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे आदींसह अन्य नगरसेवक व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Share post
Tags: JalgaonMahapalikaMarathi NewsPoliticalमहापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्वीकारला पदभार (व्हिडिओ)
Previous Post

कोरोनावर लसीकरण प्रभावी – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार

Next Post

भाजपचे आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात – ललित कोल्हे (व्हिडिओ)

Next Post
भाजपचे आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात – ललित कोल्हे (व्हिडिओ)

भाजपचे आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात - ललित कोल्हे (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group