मेष:-जवळचा प्रवास करावा लागेल. कामाची काहीशी धांदल राहील. वैचारिक स्थिरता जपावी. आवडी-निवडीवर अधिक भर द्याल. मनाची चंचलता थांबवावी.
वृषभ:-वाणीत मधुरता ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन फॅशनचे कपडे खरेदी कराल. आनंदी दृष्टीकोन ठेवून वागाल.
मिथुन:-मनाची चलबिचलता रोखावी लागेल. अतिविचार करणे टाळावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. हातातील कामाचे योग्य नियोजन करावे. फार पसारा वाढवून घेऊ नका.
कर्क:-चांगला व्यावसायिक लाभ होईल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. जिथे जाल तिथे आनंद वाटाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
सिंह:-कामाचा दर्जा सुधारेल. घराची उत्कृष्ट सजावट कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल.
कन्या:-मनाची विशालता दाखवाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल. सर्वांसमोर तुमची कला सादर करता येईल. गायन, वादन कलेला पोषक वातावरण लाभेल. धार्मिक कामात हातभार लावाल.
तूळ:-शेअर्सच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागाल. कमी श्रमात कामे पार पडतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. प्रलोभनापासून दूर राहावे.
वृश्चिक:-शांतपणे विचार करावा लागेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. कर्तव्यदक्षता चांगल्या पद्धतीने पाळाल.
धनू:-उगाचच खट्टू होऊ नये. आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
मकर:-नाटक-सिनेमा पाहण्याचा बेत आखाल. दिवस मौजमजेत घालवाल. कलात्मक दृष्टीने वागणे ठेवाल. काहीसा व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ:-समाधानी वृत्ती ठेवून राहाल. घराची स्वच्छता काढाल. बागबगीच्यात रमून जाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमाने वागाल.
मीन:-निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकून घ्याल. नातलगांशी सलोखा वाढेल.