Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी मोहिम सुरु

by Divya Jalgaon Team
March 19, 2021
in प्रशासन, राज्य
0
आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

मुंबई, वृत्तसंस्था – वीजबिल भरणा केंद्र आणि वसुली मोहिम आता सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. महावितरणाच्या कल्याण कार्यालयांर्गत ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वीजबिल त्याचप्रमाणे थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कल्याण परिमंडलांतर्गत कल्याण एक आणि दोन, वसई आणि पालघर या चार मंडलात सर्व वर्गवारीतील जवळपास २६ लाख वीज ग्राहक आहेत. कृषिपंप ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांकडून त्यांनी वापरलेल्या विजेचे चालू वीजबिलासह थकबाकीचे एकूण ९९२ कोटी रुपये मार्च अखेरपर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु मार्च महिन्यातील शेवटचे दहा दिवस शिल्लक राहत असताना ४३६ कोटी रुपयांची वसुली प्रलंबित आहे.

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ८ लाख ८० हजार ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ३७५ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम आणि अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांनी वसुली मोहिमेत सहकार्य करावे व भरणा केंद्र सुरु ठेवण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

मार्च महिन्यात आतापर्यंत कल्याण परिमंडलातील ७ लाख ५८ हजार ग्राहकांनी त्यांच्या १५२ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमाद्वारे ऑनलाईन केला आहे. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा देणाऱ्या सेवेचा लाभ घ्यावा व सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Share post
Tags: MahavitaranMarathi NewsMumbaiआता सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र
Previous Post

हर्षवर्धन कॉलनीत गटारीचे काम अपूर्ण, गेल्या पंधरा ते वीस दिवस उलटूनही महापालिकेनचे याकडे दुर्लेक्ष

Next Post

फ्लिपकार्ड कार्यालयातून तीन लाखाचे १८ मोबाईलची चोरी

Next Post
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

फ्लिपकार्ड कार्यालयातून तीन लाखाचे १८ मोबाईलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group