मुक्ताईनगर – येथील पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती सुवर्णा प्रदीप साळुंके यांचा प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सत्कार केला.
या प्रसंगी “माझी शाळा, माझी जबाबदारी “उपक्रमाची मुक्ताईनगर तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन सभापती सुवर्णा साळुंके यांनी शिक्षकांना केले आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी कोविड प्रतिबंधक उपाययोजना बाबत खात्री करणे, ऑनलाईन स्वाध्याय योजनेत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करणे, विद्यार्थी आधार नोंदणी १००% करणे, शाळेत तंबाखू मुक्त शाळा निकषांची पूर्तता करणे या बाबींचा समावेश असून दि. १६ ते ३१मार्च २०२१ या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे.
त्यासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पाठक यांचे सह केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन करत आहेत.


