जळगाव – जळगाव क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेले अधिकारी व कर्मचारी यांची टेस्ट करून रिपोर्ट जाहीर करण्यात यावे अशी मागणी अँड कुणाल पवार , अतुल कदमबांडे, भूषण भदाणे यानी आज केली.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये नुकताच पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य, प्रभारी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव , प्र कुलगुरू यांची उपस्थिती होती. त्यात काही जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे काही जण घरीच होम कोरोनटाईन झाले असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे त्यांनी सामाजिक भान ठेऊन स्वतःच पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करावे तसेच इतरांना ही चाचणी करण्यासाठी जागरूक करावे. तसेच काही अधिकारी ठेकेदाराची बीले काढण्यासाठी कार्यालयात येवून गेले व त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती लपविली असल्याचे समोर येत आहे. तरी विद्यापीठाने कार्यक्रमाला कोणाची उपस्थिती होती व किती लोक होते हे तात्काळ जाहीर करावे तसेच किती जणांनी कोरोना संक्रमित असल्याची माहिती विद्यापीठाला दिली त्याची माहिती देण्यात यावे अशी मागणी अँड कुणाल पवार यांनी कुलगुरू यांचा कडे केली.