जळगाव – २०१८-२०२३ जळगाव शहर मनपा या नावाने कैलाश अप्पा यांनी एक ग्रुप महानगरपालिकेचा सर्व नगरसेवकांसाठी बनवला होता त्यात काही पत्रकार मंडळींना ही घेण्यात आला होता. त्यात भाजपाशी बंडखोरी करणाऱ्यासाठी त्या ग्रुपचा डि.पी भाजपातील नगरसेवक अतुलसींग हाडा यांनी बदलून त्यात बंडखोऱ्यांविषयी एक संदेश देण्यात आला. त्यात क्षमा गलती की होती है …. धोखेबाजी की कोई क्षमा नही होती असे सांगण्यात आले.
आज महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यात आली. त्यात शिवसेनेतील जयश्री सुनील महाजन यांना महापौर पद तर भाजपातील बंडखोरी करणारे कुलभूषण पाटील यांना उपमहापौर पदी निवड करण्यात आली. तसेच भाजपातून शिवसेनेत गेलेले सर्वच नगरसेवकांसाठी महापालिकेचा ग्रुप मध्ये हा संदेश देण्यात आला.