जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ९२३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यात जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यातील रूग्णसंख्या वाढीस लागल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच ६५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा नऊशेच्या पार रूग्णसंख्या आढळून आली आहे. जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये ९२३ रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ६५५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात पाच रूग्ण आढळून आले आहेत.
सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. शहरात २६४ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. शहराच्या चारही बाजूंनी कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याचे यातून दिसून आले आहे. तर याच्या खालोखाल १९४ रूग्णसंख्या आढळून आली आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यामध्ये भुसावळ-४७; जळगाव ग्रामीण-४५; अमळनेर-४२; पाचोरा-१६; भडगाव-२९; धरणगाव-८६; यावल-३२;एरंडोल-६२; पारोळा-३८; जामनेर-३२; मुक्ताईनगर-३; रावेर-८; असे पेशंट आहेत.