Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता

by Divya Jalgaon Team
March 16, 2021
in राष्ट्रीय
0
युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । युजीसीने हा दावा केला आहे. आयसीएआयचे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी या निर्णयासंबंधी ट्विट केले. युजीसीने सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए शिक्षणाला पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता दिली आहे. ही आमच्या व्यवसायासाठी मोठी ओळख आहे, असे खंडेलवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सीएच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी आयसीएआयची स्थापना

आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशातील चार्टर्ड अकाउंटन्सीच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी 1949 मधील सनदी लेखाकार कायद्याखाली स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सीए शिक्षणामध्ये उच्चतम दर्जा राखण्याची जबाबदारी आयसीएआयवर आहे. ज्या विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय करायचा असेल, त्याने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा दिल्यानंतर आयसीएआयच्या फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

जूनमध्ये होणार सीए परीक्षा

सीए फाउंडेशन परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून 2021 रोजी घेण्यात येईल. आयसीएआय सीए फाउंडेशन परीक्षा 2021 ची नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिल 2021 पासून सुरू होईल आणि 4 मे रोजी बंद होईल. सीए फाउंडेशन परीक्षा 2021 पेपर 1 व 2 साठी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत घेण्यात येईल. पेपर 3 आणि 4 दुपारी 2 ते सायंकाळी 4 या वेळेत घेण्यात येईल.

सीए परीक्षा नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आहे. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आहे. काठमांडू (नेपाळ) केंद्रांमधील उमेदवारांसाठी फी 2200 रुपये आहे. उशिरा 4 मे नंतर आणि 7 मे पूर्वी फी अर्ज करण्यांना 600 रुपये दंड भरावा लागेल. त्याचप्रमाणे परदेशी केंद्राच्या उमेदवारांना 10 युएस डॉलर उशीरा दंड भरावा लागेल.

Share post
Tags: CANew Delhiयुजीसीचा मोठा निर्णयसीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता
Previous Post

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post

धक्कादायक : क्वारंटाईन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; जिल्ह्यात एकच खळबळ

Next Post
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

धक्कादायक : क्वारंटाईन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; जिल्ह्यात एकच खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group