नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोनाकाळात लॉकडाऊनदरम्यान बंद झालेली रेल्वेसेवा (Indian Railway)आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वे आपल्या व्यवस्थेत काही बदल करण्याच्या तयारीत असून, त्याचा एका भाग म्हणून प्रवासादरम्यान झोपून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत आता रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
व्हायरल होत असलेल्या वृत्तामध्ये जे प्रवासी प्रवासादरम्यान झोपून प्रवास करू इच्छित असतील त्यांच्याकडून रेल्वे १० टक्के अधिक भाडे वसूल करू शकते, असे म्हटले होते.


