मुंबई, वृत्तसंस्था : म्युचूअल फंड हे गुंतवणुकीचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. म्युचूअल फंड कंपन्या गुंतवणुकदारांकडून पैसे घेतात आणि ते पैसे वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये शेअर बाजार, बॉन्ड बाजार, मनी मार्केट इंन्स्ट्रूमेंट आणि गोल्ड यांचा समावेश आहे. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगल्या पैशांची परतफेड हवी असेल तर म्युचूअल फंड हे खरंच चांगलं ऑप्शन आहे. विशेष म्हणजे एफडी आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांपेक्षा म्युचूअल फंडमध्ये जास्त रकमेची परतफेड मिळते.
तीन महत्त्वपूर्ण म्युचूअल फंड
आम्ही तुम्हाला आज तीन म्युचूअल फंड विषयी माहिती देणार आहोत.
हे तीनही म्युचूअल फंड इक्विटी मार्केट म्हणजेच शेअर मार्केटशी संबंधित आहे. इक्विटी फंडमध्ये तुमचे पैसे स्टॉक्समध्ये गुंतवले जातात. यावर्षी Mirae Asset Tax Saver Fund सर्वाधिक फायदेशीर ठरलं आहे. यामध्ये कमीत कमी 500 रुपयांपासून गुंतवणूक केली जाते.
1) Mirae Asset Tax Saver Fund
या फंडला 2015 साली लॉन्च करण्यात आलं होतं. या फंडने गुंतवणुकदारांना 22 टक्क्याने रिटर्न दिले होते. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षभरात या फंडकडून गुंतवणुकदारांना 66 टक्के, गेल्या तीन महिन्यात 15.56 टक्के, गेल्या सहा महिन्यात 37 टक्के आणि एका वर्षात 104 टक्क्यांनी रक्कम रिटर्न मिळाली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून लोकांना दुप्पट फायदा झालाय.
2) Quant Tax Plan
Quant Tax Plan ने आतापर्यंत 104 टक्के रिटर्न दिलं आहे. या फंड प्रकाराने गेल्या तीन महिन्यात 20 टक्के, 6 महिन्यात 43 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. त्यामुळे Quant Tax Plan मध्ये गुंतवणुक केली असती तर गुंचवणूकदाराची रक्कम दुप्पट झाली असती.
3) Mirae Asset Emerging Bluechip Fund
Mirae Asset Emerging Bluechip Fund हा म्युचूअल फंड आठ वर्ष जुना आहे. यामध्ये 1000 SIP करावं लागेल. या फंडने गेल्या तीन महिन्यात 18 टक्के, सहा महिन्यात 44 टक्के तर एका वर्षात 63 टक्के रिटर्न दिला आहे.