Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्का : माजी महापौर ललीत कोल्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

by Divya Jalgaon Team
March 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
धक्का : माजी महापौर ललीत कोल्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर ललीत कोल्हे यांनी देखील शिवसेनेसोबत जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला धक्का दिला आहे.

जळगाव महापालिकेची महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक जवळ आली असतांना शिवसेनेने भाजपच्या मोठ्या गटास गळाला लावले आहे. रात्री उशीरा भाजपचे नगरसेवक हे शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांसोबत अज्ञात स्थळी रवाना झाले. यात दुपारपर्यंत माजी महापौर ललीत कोल्हे हे भाजपसोबतच असल्याचे चित्र होते. तर रात्री त्यांनी आपली भूमिका बदलून आपण शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेनेच्या सत्तेच्या दाव्याला अजून बळकटी मिळाली आहे.

आता ते स्वत: शिवसेनेला जाऊन मिळाल्याने भाजपला मोठा धक्का तर बसणारच आहे, पण शिवसेनेला याचा लाभ होण्याची शक्यता आहे. तर कोल्हे यांचे समर्थक नगरसेवक देखील हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. अर्थात, यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजपला तब्बल ५७ जागा मिळाल्या असून या खालोखाल शिवसेनेला १५ तर एमआयएमला तीन जागा मिळाल्या होत्या. आता १८ मार्च रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपमधील एका मोठ्या गटाला गळास लावले आहे. शिवसेनेने महापौरपदासाठी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी भाजपचे फुटीर सदस्य कुलभूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भारतीय जनता पक्ष आज आपले पत्ते उघड करण्याची शक्यता आहे. अर्थात, आज दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Share post
Tags: #Shivsena EntrybjpJalgaonLalit KolhePoliticalShivsenaधक्का : माजी महापौर ललीत कोल्हे यांचा शिवसेनेत प्रवेश
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १५ मार्च २०२१

Next Post

1 लाख भरा, वर्षभरात 2 लाख मिळवा, म्युचूअल फंडच्या तीन भन्नाट ऑफर

Next Post
आता म्युच्युअल फंडात तुम्ही जोरदार नफा मिळवू शकतात, कसे ते जाणून घ्या

1 लाख भरा, वर्षभरात 2 लाख मिळवा, म्युचूअल फंडच्या तीन भन्नाट ऑफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group