जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाचा उपचार करणारे २७ डाॅक्टरांसह ४८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आले. तसेच दिव्य जळगावचे प्रतिनिधींनी सिव्हिल च्या कोरोना योध्दांची सुरक्षा रामभोरेसे असल्याचे व्हिडिओ ही प्रसारित केले होते.
त्यात कोरोनाचे उपचार करणारे कर्मचारी यांना हॅन्ड ग्लोज व मास्क हेच त्यांच्या जवळ उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यांना काही सुरक्षा कवच दिले असते तर कदाचित इतक्या मोठ्या संख्येत सिव्हिलचे कर्मचारी ही पॉझिटिव्ह आले नसते.
सिव्हिलमध्ये सर्वच बेड फुल्ल आहे. पूर्वी बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. तर आता ही रुग्णसंख्या वाढली असल्याने उपचार करणारे डॉक्टरच बाधित झाल्याने उपचार करणार कोण ? याची चिंता व्यक्त केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ४८ कर्मचारी गेल्या चार दिवसांत बाधित झाले आहेत. यात १७ निवासी डॉक्टर्स व विविध विभागाचे ९ डॉक्टर्स, नर्सिंग १०, टेक्निशियन ३, फार्मासिस्ट १ तर नर्सिंग स्टाफ प्रमोशनचे ७ कर्मचारी अशा एकूण ४८ जणांचा समावेश आहे.