जळगाव – जिल्ह्याचा कोरोना वाढीत संपूर्ण देशात पहिल्या दहा जिल्ह्यात क्रमांक आला असताना कोरोनाशी लढा आणखी तिव्र झाला. प्रशासन ॲक्शन मोडमध्ये असताना जिल्हा शासकीय महाविद्यालयात कोरोना योध्दा म्हणून सेवा देत असणाऱ्यांची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे.
अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या सिव्हिलमध्ये मात्र सेवा देणाऱ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्राथमिक साहित्य पुरविले जात नाहीय. दिव्य जळगाव चे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष सिव्हिल येथे गेले असता त्यांच्या हाती ते सत्य आले. कोरोना असलेल्या महिला रूग्णाची तब्येत बिघडल्याने त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांजवळ साधा मास्क आणि हॅन्ड ग्लोज एवढेच दिसले.
अतिदक्षता विभागात एवढ्या सुरक्षेवरच ते कर्मचारी वावर करीत होते. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी मोठा खर्च करण्याचा गवगवा केला जात असताना मात्र तसे काही दिसत नाही. स्वतः सह परिवाराचा जिव धोक्यात घालून कोरोना योध्दा म्हणून कार्य करणाऱ्यांची सुरक्षितेला प्राधान्य दिले पाहिजे अशी बोलले जात आहे.