शिरूर, पुणे। प्रतिनिधी – शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक १८ मार्च किंवा १९ मार्च या दिवसापासून कोविड लस उपलब्ध होणार असून, त्यासाठीची परवानगी आरोग्य खात्याकडून मिळाली असल्याची माहिती शिरूर-हवेलीचे आमदारॲड. अशोक पवार यांनी दिली आहे.
आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शिरूर शहरात लसीकरण सुरू होणार असून यामुळे शहरातील वृद्ध, महिला, व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शिरूर तालुक्यात याअगोदर प्राथमिक रुग्णालय, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात मध्ये covid-19 लस देण्याचे सुरू केले आहे.
काही जणांनी पाहिला तर काही जणांनी दुसरा डोसही याचा पूर्ण केला आहे.
परंतु कोवीड लस शिरूर शहरात सुरू करावी यासाठी शिरूर पंचक्रोशील नागरिकांनी आमदार अशोक पवार यांना मागणी विनंती केली होती.
शिरूर शहरात कोविड लसीकरण उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अशोक पवार यांचे शिरूर सर्व नागरीकांनी यांनी आभार मानले आहे .
शिरूर शहर पंचक्रोशी व इतर भागातील नागरिकांना शिरूर शहर सोईस्कर असून शिरूर शहरात ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लस उपलब्ध करावी अशी मागणी केली होती.
शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांना कोविड लस घेण्यासाठी करडे शिक्रापूर या भागात जावे लागत असल्याने मोठा त्रास होत होता.
यात वृद्ध नागरिकांची शिरूर शहरात लसीकरण सुरू व्हावे अशी मागणी होती.
ही मागणी आमदार अशोक पवार यांनी पूर्ण करून शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे ही लस गुरुवार दिनांक 18 मार्च पर्यंत किंवा एका दिवस पुढे 19 मार्च पासून उपलब्ध होणार असून त्याच्यात सर्व मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर शहरात कोवीसड लसीकरण उपलब्ध व्हावे यासाठी शहरातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी होती. यासाठी आमदार अशोक पवार यांना विनंती केली होती.
त्यादिवशी आमदार पवार यांनी शिरूर शहरात लवकरात लसीकरण सुरू करणार आहे. असा शब्द दिला आणि तो दिलेला शब्दपूर्ण करून शहरातील नागरिकांना दिलासा दिला आहे.
शिरूर ग्रामीण रुग्णालय शेजारी असणारे प्राथमिक रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शिरूर शहर व पंचक्रोशी व इतर नागरिकांसाठी कोविड लस सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असून, त्यासाठीचे काम या इमारतीमध्ये सुरू झाले आहे.
येथील नागरिकांना कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. गुरुवार 18 मार्च किंवा19 मार्च रोजी या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
तुषार पाटील अधीक्षक शिरूर ग्रामीण रुग्णालय.


