जळगाव – महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.