जळगाव, प्रतिनिधी – कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रशासन उपाययोजना करत संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९८३ कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगाव शहरासह बहुतांश तालुक्यांमधील रूग्णसंख्या वाढीस लागल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर आज दिवसभरात ४४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर – २२२, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ-५७, अमळनेर-५८, चोपडा-१३३, पाचोरा-१७, भडगाव-१५, धरणगाव-७१, यावल-१३, एरंडोल-२, जामनेर-१६३, रावेर-३२, पारोळा-३०, चाळीसगाव-१०२, मुक्ताईनगर-२४, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातून ९ असे एकुण ९८३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात आज एकुण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरात दोन तर चोपडा, भडगाव, एरंडोल आणि चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. आजवर एकुण ६६ हजार ७२६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५९ हजार ५८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार ७२५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ.एन.एस. चव्हाण यांनी कळविले आहे.