Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वरणगावात शासनाच्या कामात फुकट पुढाऱ्यांचा त्रास

by Divya Jalgaon Team
October 28, 2020
in जळगाव
0
jalgaon news

वरणगाव –  केंद्र शासनाच्या नियोजनानुसार वरणगाव परीसरातील महामार्गाचे रुंदीकरणाचे  काम  सुरू असुन ठेकेदारांना संधीसाधु फुकट पुढाऱ्यांचा मानसिक त्रासात वाढ झाली असुन, त्यामूळे महामार्गाचे काम खोळंबण्याची शक्यता  आहे

केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशातील सर्वच महामार्गाचें नुतनीकरणासह रुंदीकरणाचे  नियोजन करून  ठेकेदारांमार्फत महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत काम सुरू करण्यात आले आहे. या परीसरात भुसावळ ते मुक्ताईनगर तीस कि.  मी अंतरांत महामार्गांची उंची, रुंदी  व ठराविक ठिकाणांवरील पुलांच्या भरतीकरीता सभोवतालच्या नदयांमधील उत्खनन करून भराव करणे जेणेकरून नदयांचे खोलीकरण होऊन पाण्याचा साठवा  सुद्धा होईल आणि नियोजीत काम देखील होईल.

परंतु नदयांमधील गौण खनिज काढून झाल्यास किंवा महार्गाचे काम अर्धवट राहिल्यास रुंदीकरणासाठी  मुरुम व पुलांच्या भरावां साठी महाजनको मधील राखेचा वापर करण्यात यावा या माध्यमातून नियमित कोळशाची निर्मित होणारी राखेची विल्हेवाट होऊन शासनाला आर्थिक  लाभ होऊ शकतो त्या माध्यमातून शासन निर्णयानुसार महामार्गाचे नियोजीत काम सुरू आहे.  भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको विज प्रकल्पातील कोळशाची निर्मित होणारी राख विल्हाळे शिवारातील वनविभागात शासनाने कोट्टयावधी रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या बंडात कित्तेक दिवसांपासुन गोळा केली जात आहे. काम ही महामार्गचे काम करणारे ठेकेदार करीत असल्याने शासनाचा दुरुस्तीला लागणार  निधी वाचणार आहे .

या मथळ्याखाली ठेकेदारांना वेठीस पकडण्यासाठी आंदोलने, उपोषणे, मोर्चे, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वृत्त प्रसीद्ध करून घेणे, शासकिय अधिकाऱ्यांना धमकावणे, पोलिस प्रशासनाला वारंवार धारेवर धरणे, असे प्रकार सुरू केले आहे. या माध्यमातून अधिकारी वर्ग कंटाळून ठेकेदाराला सांगुन यांना काहितरी काम द्या किंवा आर्थिक तडजोड करून दाती मीटवा असे सांगुन सुटका करून घेत आहेत आणि त्याला हे नकली पुढारी प्रतिसाद देखील देत आहेत.  परंतु एक तंटा मिटवला तर दुसरा तंटा उभा केला जात असल्याने ठेकेदार वर्ग देखील या संधी साधु लोकांना वैतागले असुन, त्यांनी राखवाहतूक बाबत नविन पर्याय निवडला असल्याचे निदर्शनात आले असले तरी या गल्ली छाप पुढाऱ्यांमुळे महामार्गाचे काम खोंळबळ्याची शक्यता वर्तवली जात असुन वरीष्ठानी लक्ष देण्याची गरज आहे

Share post
Tags: Jalgaon newsMarathi NewsRoadStartVarangaon NewsWorkमहामार्गाचे काम खोळंबण्याची शक्यता आहे
Previous Post

हा तर संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान – संजय राऊत

Next Post

जळगाव महापालिकेची राजकीय समीकरणे बदलू शकतात का ?

Next Post

जळगाव महापालिकेची राजकीय समीकरणे बदलू शकतात का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group