चोपडा (मिलिंद सोनवणे)- चोपडा येथील आदर्श नगरातील रहीवाशी श्रीमती प्रमिला बडगुजर ह्या छान शी अशी नर्सरी चालवतात, त्यांच्या नर्सरीत आरोग्य वर्धक वनस्पती आणि आयुर्वेदिक व आध्यात्मिक महत्व असणारी, आकर्षक फुला फ़ळाची झाडे, बाग त्यांनी स्वतः तयार केली आहे.
कोणीही त्यांच्याकडे रोपे घ्यायला आले तर त्यां औषधीयुक्त झाडांचे महत्व तसेच ते कोणत्या आजारावर उपयुक्त आहेत हे माहिती देतात. त्यांच्या तरुणपणीच पतिच्या अचानक निधना नंतर त्यां एकाकी पडल्या त्यावेळी ते बिड़गाव गावचे सरपंच पदावर होते पण ,त्यांनी ते पद सोडले. त्यांचे दोन लहान मुले यांच्या आयुष्याचा पुढे काय् होणार याची त्यांना असणारी चिंता ? माझ आयुष्य तर दुखाच्या खाडित गेले, पण मला मुलांसाठी जगावेच लागेल,त्यांचे भविष्य मला चांगल्या प्रकारे घडवायच आहे, म्हणून त्यांनी खचून न जाता स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी दुख विसरण्यासाठी आपल्या घराच्या वॉल कम्पाउंड मध्येच नर्सरी सुरु केली.
त्यां एक उत्कृष्ट कला शिक्षिका ही आहेत,म्हणून नर्सरीत त्यांनी त्यांची कला वापरून छान सजावट ही केलेली आहे. त्याच बरोबर मुलगी व मुलाला आई असून ही वडिलांसारखे प्रेम करतात व त्यांना वडिलांची कमी न भासू देतात त्यांचा सांभाळ करतात. शाळेला लागणारे झाडे, पटांगण,धार्मिक स्थळ यांना ते ना नफा न तोटा ह्या तत्वावर झाडे पुरवितात. वृक्षच आपल्याला प्रदुषणा पासून वाचवु शकतात त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा असा ही संदेश ते नेहमी सर्वांना देत असतात.
आपल्या जीवनात आलेले दुख,नैराश्य कोणाच्या वाटयाला येवू नये म्हणून त्यां नेहमी दुसऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देत असतात तसेच ते विविध घरगुती व्यंजन,मसाले,टूथ पावडर,सेन्द्रिय खत,सेन्द्रिय गुळ,त्यां स्वतः तयार करतात. इतर सर्व प्रपंच मुलांचे संगोपन, शिक्षण, सुख दुःख सांभाळून त्यां मुलींच्या शाळेत म्हणजेच ” कै मो.करोडपती,माध्यमिक विद्यालयात ” कला शिक्षिका म्हणून उत्तम प्रकारे आदर्श शिक्षिका म्हणून विद्यार्थींना घडविण्याचे काम करतात. म्हणून अश्या कर्तुत्वान महिलांचा आदर्श समाजातील दुःखी, पीड़ित महिलांनी घ्यावा असाच म्हणावा लागेल.
खरच अश्या महिलांकड़े पाहिल्यावर मनात अस वाटत की जागतिक महिला दिनाचे उद्दिष्ट पुर्ण झाले आहे व होत आहे. मी आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एकच म्हणेन…….
स्त्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृति,
स्त्री म्हणजे नावीण्याचा वसा,
स्त्री म्हणजे घराच घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य,
अश्या ह्या स्त्री शक्ति ला मानाचा मुजरा.