Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह

by Divya Jalgaon Team
October 28, 2020
in जळगाव
0
Jalgaon News

जळगाव-  महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे २७ ऑक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार आणि अधिकारांच्या दुरुपयोगाविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे.

३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त हा सप्ताह साजरा करण्यात येत असून या आठवडा “दक्षता जागृती सप्ताह” म्हणून ओळखला जातो. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दती नष्ट करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्याचा या सप्ताहाचा हेतू आहे.

जागरुकता मोहिमेअंतर्गत , ॲन्टी करप्शन ब्युरो विभागाचे कार्य, भ्रष्टचाराविरोधी कायद्याची माहिती आणि सर्वसामान्य नागरीकाने आपले शासकीय काम

करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काहीवेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, सरकारी कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वित होते. या धारणेला बदलण्याची गरज आहे.  प्रत्येक नागरीक सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात.  भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन ॲन्टी करप्शन ब्युरो पोलीस उप अधिक्षक जी. एम. ठाकूर यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यात या सप्ताहात ॲन्टी करप्शन ब्युरो पोलीस अधिक्षक सुनिल कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, ॲन्टी करप्शन ब्युरो पोलीस उप अधीक्षक दिनकर पिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती सप्ताहातंर्गत भ्रष्टाचाराविरोधात जागरुकता करण्यात येणार आहे.

नागरीकांनी लोकसेवकाबद्दल आपली काही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक -१०६४, दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३५४७७, मोबाईल क्रमांक-९००७५५६५५६ अथवा [email protected] या ई मेलवर करण्याचे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

Share post
Tags: ACB NewsJalgaon newsMarathi News
Previous Post

कंगनाची ‘तेजस’च्या कामाला सुरुवात

Next Post

हा तर संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान – संजय राऊत

Next Post
महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले

हा तर संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group