चोपडा (मिलिंद सोनवणे) – माल भरलेल्या गोणी चे वजन इलेक्ट्रॉनिक काटयावर कमी करता येत नसून त्यां मोबदल्यात २०० ग्राम धान्य जास्त मोजले जात होते अशी माहिती चोपडा कृषी उत्प्नन्न बाजार समिती चे सभापति कांतिलाल पाटिल यांनी रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या वेळी माजी सभापति व संचालक गिरीश पाटिल, संचालक रामलाल कंखरे, नितिन पाटिल, हितेंद्र देशमुख, सचिव एन, आर,सोनवणे, वरिष्ठ लिपिक जितेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. दि. ४ मार्च रोजी ज्या व्यापाऱ्याने नरवाड़े येथील प्रल्हाद धनगर या शेतकऱ्यांचा माल घेतला होता. त्याच्या एवजी ओम ट्रेडिंग कंपनीचे राजेन्द्र जैन यांच्या नावाचा बोभाटा पिटन्यात आला होता. म्हणून त्यांचा काहीही समंद नव्हता ह्या प्रकारने व्यापाऱ्यांची नाहक बदनामी करण्यात आली म्हणून शुक्रवार व शनिवार ह्या दोन दिवशी सर्व व्यापाऱ्यानी एकजुट करून कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार खरेदी विक्रीचे व्यवहार बन्द ठेवले आले असल्याचे सांगण्यात आले.
या पुढे असा कोणताही वाद झाला तर तो आम्ही आमच्या समिती मार्फ़तच सोडवू अस कांतिलाल पाटिल सभापती यांनी सांगितले. तसेच भविष्यात शेतकऱ्यांचा लीलाव थांबणार नाही असे ही उपसभापती नंदकिशोर पाटिल यांनी सांगितले.