चोपडा (मिलिंद सोनवणे)- चोपडा येथील यशोधन चैरिटेबल ट्रस्ट चे नाव शहरात नव्हे तर जिल्ह्यात ही ते तितकेच प्रसिद्ध आहे. चोपडा शहरात कारगिल शहीद दिनाचा कार्यक्रम घेणे, शहीदाना मान वंदना देणे, स्वस्छ भारत अभियान असे अनेक उपक्रम ते नेहमीच राबवत असतात. दरवर्षी रक्तदान शिबीर घेणे, कोरोना काळात मास्क, सेनेटायजर वाटप, गोरगरीबांना सदैव मदत करणे अशी ओळख असणारे दाम्पत्य म्हणजेच डॉ.राहुल पाटील व त्यांच्या अर्धांगिनी डॉ. तृप्ती पाटील …
पाटिल दाम्पत्य स्वभावाने अगदी मृदु ,गोड़, तसेच सतत समाजाचे काहीतरी देण लागतो ह्या विचार धारेने काम करत असतात. शहरात एक उत्कृष्ट असे डेंटिस्ट व आय स्पेशालिस्ट असलेले पाटील कुटुंब समाज सेवा हिच ईश्वर सेवा अस मानतात. गोरगरीबांना आणि सैनिकांच्या कुटूंबियांना माफक दरात, सुविधा देतात. शैक्षणिक क्षेत्रात ही यशोधन चारिटेबल ट्रस्ट ने ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करून कमीत कमी कालावधीत चांगले शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे.