जळगाव – महासभेत झालेला ठरावात ६२ काेटी रूपयांच्या कामांचे २७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असले तरी सत्ताधारी व विराेधी पक्षातील नगरसेवकांचे प्रस्ताव यात आहे. याकामासाठी नगर विकास विभागाकडून निधी मंजूर करावा लागणार आहे त्यामुळे नगरसेवकांचे यात डोके दुखी वाढणार आहे.
महापाैर व उपमहापाैर निवडीच्या हालचालींना गती आली आहे. महापौर व उपमहापौर निवड दि. १८ मार्च ला होणार असून त्यासाठी काळ पासूनच फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे त्यामुळे शुक्रवारी झालेल्या महासभेत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना अपेक्षित असलेल्या कामांचे प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न केला.यात अनेकांनी विकास कामांचे नियाेजन केले तर काहींनी जागांचा विकास, कमानी उभारणे, राष्ट्रपुरूषांची नावे देण्यास मंजुरी घेतली. विकास कामांचे सुमारे २७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यात भाजप, शिवसेना व एमआयएमच्या नगरसेवकांचेही प्रस्ताव असून सुमारे ६२ काेटींची कामे आहेत.
नगरसेवकांच्या मागणीनुसार महासभेत ठराव करण्यात आले असले तरी त्या कामांसाठी महापालिका फंड अथवा डीपीसीमधून निधी मिळणार नसून त्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणण्याची अट घालण्यात आली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाकडे या कामांचे प्रस्ताव सादर करून त्यासाठी नगरसेवकांना आपली सेटिंग लावावी लागणार आहे.
दाेन महासभांत ८४ विषयांवर चर्चा, ७८ विषय मंजूर
शुक्रवारी झालेल्या दाेन महासभांमध्ये ८४ विषयांवर चर्चा झाली. त्यात ७८ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण १४० काेटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात प्रशासनाकडून आलेल्या रस्त्यांच्या कामांना तसेच अमृत याेजनेतंर्गत वाढीव भागातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे.