Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हॉटेलमध्ये वीजेची जोडणी करण्यासाठी सहा हजारांची लाच स्विकारताना अटक

by Divya Jalgaon Team
March 5, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
हॉटेलमध्ये वीजेची जोडणी करण्यासाठी सहा हजारांची लाच स्विकारताना अटक

जळगाव प्रतिनिधी । हॉटेलमध्ये वीज कनेक्शन जोडणी करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्विकारताना वीज वितरण कंपनीचे दोन कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाने आज अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

अमोदा खुर्द ता.जि.जळगाव येथील तक्रारदार या ठिकाणी स्वतःच्या शेतामध्ये हॉटेल असुन सदर ठिकाणी विज कनेक्शन मिळणेबाबत म.रा.वि.वि.कंपनी कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर केलेला होता. यासाठी तक्रारदाराने डिमांड नोट देखील भरलेली होती. मात्र विज कनेक्शन जोडुन देण्यासाठी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र धनसिंग पाटील आणि कंत्राटी वारयमद प्रल्हाद उत्तम सपकाळे यांनी तक्रारदाराकडे सात हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेतून यासाठी सहा हजार रूपये ठरले. या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

यात दोन्ही संशयितांना पंचासमक्ष सहा हजार रूपये स्वीकारतांना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर रविंद्र धनसिंग पाटील, (वय-४७, व्यवसाय- वरीष्ठ तंत्रज्ञ, म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत सबस्टेशन विदगाव. रा. फुपनगरी, ता.जि.जळगाव. ह. मु. – एमएसईबी कॉलनी, जळगाव) आणि प्रल्हाद उत्तम सपकाळे, (वय-४१, कंत्राटी वायरमन, रा.विदगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईत
एसीबीचे डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर, पोना. मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share post
Tags: #ACBcrimeJalgaonMarathi Newsहॉटेलमध्ये वीजेची जोडणी करण्यासाठी सहा हजारांची लाच स्विकारताना अटक
Previous Post

सावधान : जिल्ह्यात आज ७७२ रुग्ण कोरोनाबाधीत आढळले

Next Post

कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ

Next Post
कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ

कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group