जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात तब्बल ७७२ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत पाच रूग्णांचा मृत्यू झाल्याने आजवरच्या कोरोना बळींची संख्या चौदाशेवर गेली असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार गत चोवीस तासांमध्ये ७७२ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात २४६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जिल्ह्यातील पाच रूग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे आजवरच्या कोरोना बळींची संख्या १४०१ इतकी झालेली आहे.
चोवीस तासांमध्ये सर्वाधीत कोरोना बाधीत रूग्ण जळगाव शहरात ३५९ इतके आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-१०७; भुसावळ-६४; तर चाळीसगाव ५१ इतके पेशंट आढळून आले आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता; जळगाव तालुका-२३; एरंडोल-४८; अमळनेर-१९; बोदवड-६, पाचोरा, व भडगाव प्रत्येकी-२; धरणगाव-२४; यावल-१७; जामनेर-१३; रावेर-३ पारोळा-१५; व मुक्ताईनगर -१८ असे रूग्ण आढळून आले आहेत.