चोपडा (छोटू वाढे) – तालुक्यातील सावखेडा येथे डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन इंडियाची पंच परीक्षाचे आयोजन इंडियन पब्लिक स्कुल सावखेडा ता. चोपडा येथे रविवारी 28 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भालचंद्र मोरे, कार्यक्रमाचे उद्घाटक व परीक्षा निरीक्षक, जळगाव जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. देवदत्त पाटील, डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशन प्रमोशन इंडीयाचे सहसचिव प्रा. बाबा बावीस्कर, डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन प्रमोशन इंडीयाचे तांत्रिक समिती चे अध्यक्ष सचिन पाटील व त्याच बरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद इ. जिल्ह्यातील अनेक अखिल भारतीय पंच परीक्षेसाठी पंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र महाजन यांनी केले.तर आभार गजानन पाटील यांनी मानले.