जळगाव, अशोक पाटील । जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे भरवस्तीत जिर्ण पोल झाला आहे. गेल्या पंधरा ते विस वर्षापासुन विजेचा खांब खालून पुर्ण गंजलेला असुन तो कोणत्याही क्षणी पडू शकतो. विजेचा खांब भरवस्ती व गजबजलेल्या ठिकाण असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. विजेचा पोल बदलून मिळण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयापासून ते कनिष्ठ कार्यालयाकडे दहा ते बारा वेळा तक्रारी केल्या असतांना देखील पोल बदलविण्यासंबधी कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महावितरण नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप शिरसोली- चिंचोली जि.प. गटाच्या सदस्या धनुबाई वसंत आंबटकर यांनी केला आहे. तसेच पोल बदलून मिळण्यासाठी महावितरणकडे त्यांनी तक्रारीही केल्या आहेत.