जळगाव – जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व्हर कमकूवत झाल्याने तलाठ्यांना फेरफार नोंदीसह अन्य कामे करता येत नाही यामुळे सजेवर तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
सातबारा वाटपासाठी व फेरफार नोंदणीसाठी शासनाकडून देण्यात आलेल्या सॉफ्टवेअर सुरळीत चालत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील तलाठ्यांना ऑनलाईन नोंदी टाकण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून यामध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याने संपूर्ण जिल्ह्यातून तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून तहसिलदारांकडे डी.एस.सी जमा केली जात असल्याचे वृत्त आहे. सर्व्हर सुरळीत चालत नसल्याने फेरफार नोंदसह, सात बारा उतारा, पिक पेरा नोंदी सह अन्य कामे होत नसल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला तलाठ्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन नोंद टाकण्यासाठी बारा-बारा तास वेळ लागत असल्याने तलाठ्यांना मनस्ताप होत आहे. दरम्यान जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात हिच परिस्थिती असल्याने तत्काळ सर्व्हर दुरूस्त करून जिल्हा पातळीवर स्वतंत्र सर्व्हरची व्यवस्थेची मागणी जोर धरू लागली आहे.


