जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आज देखील वाढीस लागल्याचे दिसून आले असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ४९२ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर व तालुक्यासह चाळीसगाव, चोपडा आदी तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज जिल्ह्यात ४९२ बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर गत चोवीस तासांमध्येच १४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जळगाव शहरात १२४ बाधीत रूग्ण असल्याचे रिपोर्टमधून अधोरेखीत झाले आहे. जळगाव तालुक्यात हाच आकडा ५३ इतका आहे. चोपडा तालुक्यात ७३ रूग्ण बाधीत असल्याचे दिसून आले आहे. चाळीसगाव तालुक्यात ८० पेशंट असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
दरम्यान, उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, भुसावळात जामनेर ३७, भुसावळ २७; मुक्ताईनगर-१८, बोदवड-७; एरंडोल-१७; धरणगाव-१३; रावेर-१८; पारोळा-८; यावल व अमळनेर-२ असे रूग्ण आढळून आले आहेत.