Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

१५ दिवसांच्या लेकीला घेऊन कामावर हजर झाल्या SDM साहेबा

by Divya Jalgaon Team
October 13, 2020
in राष्ट्रीय
0
sdm saheba

गाझियाबाद- भारतामध्ये दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढताच  आहे.  लाखो योद्धे कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. अनेक सरकारी अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आऊट ऑफ द बॉक्स जाऊन करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सहभागी झालेत.

असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमधून समोर आलं आहे. येथील उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या पांडे यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर १५ व्या दिवशीच पुन्हा कार्यालयात हजेरी लावली आहे. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी २६ वर्षीय सौम्या यांनी आपल्या लहान बाळाला घेऊनच कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे सध्या सर्वच स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे.

सध्या मोदीनगरच्या उपविभागीय 

सध्या मोदीनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या या सात महिन्याच्या गर्भवती असतानाच जुलै महिन्यात त्यांना करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये गाझियाबाद जिल्ह्याच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. जिल्ह्यामध्ये दिवसाला १०० हून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते त्यावेळी नियमांनुसार सौम्या यांना मॅटर्निटी लीव्ह म्हणजेच गरोदर महिलांना देण्यात येणारी विशेष सुट्टी घेण्याची मूभा होती.

मात्र त्यांनी सुट्टी घेण्याऐवजी आपल्या क्षेत्रामध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भातील महत्वाचे दौरे सुरुच ठेवले. अनेक ठिकाणी सौम्या यांनी स्वत: जाऊन आरोग्य व्यवस्थांची पहाणी केली. १७ सप्टेंबर रोजी सौम्या यांनी मेरठमधील एका रुग्णालयामध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांनंतर त्या आपल्या लहान मुलीला घेऊन कार्यालयामध्ये कामाला रुजू झाल्या.

सौम्या म्हणाल्या की,”डॉक्टर, नर्स आणि अनेक लोकं करोनाच्या कालावधीमध्ये अथक कष्ट करत आहेत. अशा वेळेस मी स्वत:च्या कर्तव्यापासून दूर राहणं चुकीचं आहे. मी केवळ २२ दिवसांची सुट्टी घेतली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर दोन आठवड्यांनी मी कामावर रुजू झाले आहे”.

Share post
Tags: CoronaGaziyabaadMr. SDM came to work with a 15-day-old babySDM Saheba
Previous Post

जागतिक बँकेने अहवालानुसार शिक्षण व्यवस्थेला देखील बसला कोरोनाचा फटका

Next Post

आरके फिल्म आता पुन्हा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post
R K Films

आरके फिल्म आता पुन्हा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group