मुंबई, वृत्तसंस्था : मार्चच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली.
याआधीही 25 फेब्रुवारी रोजी किंमतीत वाढ झाली होती. याआधी 4 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ होती. तर 14 फेब्रुवारीला 50 रुपयांची वाढ होती. इतकंच नाहीतर 25 फेब्रुवारीला यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली होती. फेब्रुवारीमध्ये एलपीजीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली.
खरंतर, पुन्हा एकदा 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. किंमती वाढल्यामुळे दिल्लीत घरगुती गॅसचा दर 794 रुपयांवरून 819 रुपयांवर आला आहे.