वृषभ:-ताण व त्रस्तता घालवावी. कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण हवे. दूरदृष्टीतून सकारात्मकता साधावी. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.
मिथुन:-एकतर्फी वाद वाढवू नका. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. योग्य कृतीतून ताण हलका होईल. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल.
कर्क:-खाद्यपदार्थात रमून जाल. पोटाचे विकार सतावतील. मनातील निराशा दाटून येऊ शकते. करियर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.
सिंह:-उत्तम व्यावसायिक लाभ होईल. चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा. प्रयोगशील राहावे लागेल. आपल्या ज्ञानात भर पडेल. नोकरदारांची समस्या मिटेल.
कन्या:-आराम हराम आहे, हे ध्यानात घ्यावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उगाचच चिडचिड करू नका. हाती घेतलेल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. नियोजनात फारसा बदल करू नका.
तूळ:-काही कामे त्वरेने आवरती घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. मन प्रसन्न राहील. कामात ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या स्वरुपात बदल करण्याचा विचार कराल.
वृश्चिक:-जुन्या निर्णयावर पुनर्विचार करावा. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कमी वेळेत कामे पार पडतील. तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल. महत्त्वाचे कागद जपून ठेवावेत.
धनू:-कामात काहीसा उत्साह जाणवेल. निर्णय चांगले संकेत देतील. घरगुती कामावर भर द्याल. जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. एकमेकातील एकोपा वाढेल.
मकर:-व्यावसायिक गणित जुळेल. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. मनाची चंचलता दूर सारावी. धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे. हातात काही नवीन कामे पडतील.
कुंभ:-जवळचे मित्र समजून घेतील. बोलताना भान राखावे. अन्यथा नुकसान संभवते. चांगली संगत ठेवावी. हतबल होण्याची आवश्यकता नाही.
मीन:-आर्थिक बाजू सुधारेल. समाधानकारक घटना घडतील. अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका. योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील.