चोपडा (छोटू वाढे) – तालुक्यातील चुंंचाळे येथील रहिवासी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते,पदाधिकारी स्व.गोविंदा दोधू पाटिल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रूग्ण वाहिका लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी चोसाकाचे माजी चेअरमन अॅड. घनःश्याम पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कै. गोविंदा भाऊ पाटिल यांनी केलेल्या कार्याचा व समाजाला दिलेल्या निस्वार्थ सेवेचा उल्लेख केला.
याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जि. प. सदस्या नीलम पाटील, इंदिराताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील व तालुक्यातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी भाऊंच्या कुटुंबातील सदस्यांनी लोकांच्या सेवेसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.


