Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

2 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in जळगाव
0
jalgaon news

जळगाव – महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ॲन्टी करप्शन ब्युरो) जळगाव युनिटतर्फे 27 ऑक्टोबर ते दिनांक 2 नोव्हेंबर,2020 या कालावधीत भ्रष्टाचार आणि अधिकारांच्या दुरुपयोगाविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर, 2020 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त हा सप्ताह साजरा करण्यात येत असून या आठवडा “ दक्षता जागृती सप्ताह” म्हणून ओळखला जातो. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दती नष्ट करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्याचा या सप्ताहाचा हेतू आहे.

जागरुकता मोहिमेदरम्यान, ॲन्टी करप्शन ब्युरो विभागाचे कार्य, भ्रष्टचाराविरोधी कायद्याची माहिती आणि सर्वसामान्य नागरीकाने आपले शासकीय काम करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काहीवेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, सरकारी कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वित होते. या धारणेला बदलण्याची गरज आहे. प्रत्येक नागरीक सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात. भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन जी.  एम.  ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यात या सप्ताहात श्री सुनिल कडासने, पोलीस अधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, नाशिक परिक्षेत्र नाशिक, श्री. निलेश सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक व श्री. दिनकर पिगळे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती  सप्ताहातंर्गत भ्रष्टाचाराविरोधात जागरुकता करण्यात येणार आहे.

नागरीकांनी  लोकसेवकाबद्दल आपली काही तक्रार असल्यास  टोल फ्री क्रमांक -1064, दुरध्वनी क्रमांक 0257-2235477, मोबाईल क्रमांक-9607556556 अथवा [email protected] या ई मेलवर करण्याचे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

Share post
Tags: JalgaonJimaka News
Previous Post

जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यास परवानगी

Next Post

मुंबई हाय अलर्ट: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा

Next Post
mumbai high alert

मुंबई हाय अलर्ट: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group