ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव – येथील नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान अंतर्गत जलसंधारण कामांची सुरुवात आ.मंगेश चव्हाण, ईडीचे उपायुक्त उज्वल कुमार चव्हाण यांच्या प्रेरणेने व गुणवंत सोनवणे याचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते व जलमित्र सोमनाथ माळी याचे प्रयत्नातून जलसंधारणाच्या कामांना सुरवात झाली आहे. तसेच सहज जलबोध अभियान अंतर्गत उपेंद्र धोंडे यांचे मार्गदर्शनाखाली जल आराखडे तयार करण्याचेही कामे सुरू आहेत.
गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचे उद्दीष्ट हाती घेऊन गाव शिवारात गेली चार वर्षापासून लोकसहभागातून जलसंसाधनाचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मागील तीन वर्षापुर्वी जलयुक्त शिवार अभियान योजना अंतर्गत बारा सीमेंट बाध खोलीकरण व रूदीकरण करण्यात आले आहेत. दोन वर्षापुर्वी गावाने पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत सहभागी होऊन तसेच मागील वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितित शिवनेरी फाउंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानात रोटरी क्लब चेंबूर व सेवा सहयोग संस्था पुणेच्या माध्यमातून पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले होते.
यामाध्यमातून जवळपास एक लाख चाळीस हजार घनमीटर काम झाले होते त्यामुळे चौदा कोटी लिटर जलसाठा पहिल्याच पावसात निर्माण झाला होता. यावर्षीही मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचे नियोजन झाले असुन याअनुषंघाने दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पोकलॅन्ड मशिन उपलब्ध झाले असुन या कामाचा शुभारंभ संभाजी चिधा मोरे व त्याची पत्नी या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते झाला.
याप्रसंगी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष भिवसन दिगंबर देसले,भाऊसाहेब देसले,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तात्रय मोरे,पंकज देसले,शिवनेरी फाउंडेशनचे महेन्द्र पाटील व रम्हणे येथील शेतकरी उपस्थित होते.