मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागला असून सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्य सरकारने आज (२६ फेब्रुवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ८ हजार ३३३ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत आज नवीन ४ हजार ९३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यासाठी दिलासादायक बाब अशी की आतापर्यंत एकूण २० लाख १७ हजार ३०३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ६७ हजार ६०८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.३६ % इतके झाले आहे.
राज्यात आज 8333 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4936 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2017303 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 67608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.35% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 26, 2021