जळगाव – भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राला योग्य ते सहकार्य करून युवा स्वयंसेवकांच्या मदतीने जिल्ह्यात अधिकाअधिक चांगले उपक्रम राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.
जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त अनिसा तडवी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे, एनसीसीचे हेमा राम, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी विजयसिंग पवार, जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा परिषदेचे डॉ.मनोहर बावणे, लीड बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, एनएसएसचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे आदी उपस्थित होते.
बैठकीला नेहरू युवा केंद्राचे लेखालिपिक अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, रणजीतसिंग राजपूत, भूषण लाडवंजारी, नितीन नेरकर, प्रशांत बाविस्कर, मोतीलाल पारधी आदी उपस्थित होते.
नेहरू युवा केंद्रातर्फे गेल्यावर्षी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक संस्कृती फाऊंडेशन, भुसावळ, द्वितीय क्रमांक नेहरू युवा मंडळ गडखंब, अमळनेर तर तृतीय क्रमांक आकाश धनगर यांनी पटकावला होता. मंगळवारी बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.