जळगाव प्रतिनिधी – जळगाव येथील मानसी राजेश शर्मा हिला ‘आयकॉनिक ग्लॅमर फॅशन आयकॉन 2021’ अवार्ड प्राप्त झाला आहे. पुण्यात झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये मानसी शर्मा हिला ट्राॕफी देऊन गौरविण्यात आले.
मोहम्मद नागमन लतीफ, मिहिर जोशी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असलेली मानसी शर्मा हीला नामांकित स्पर्धांमध्येही पारितोषिक मिळाले आहेत. मानसी जैन इरिगेशनचे सहकारी राजेश शर्मा यांची कन्या असून तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.