Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शावैम’ मध्ये ३४ जणांनी घेतला कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस

दिवसभरात १७४ जणांनी घेतली लस

by Divya Jalgaon Team
February 18, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
शावैम’ मध्ये ३४ जणांनी घेतला कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी १८ फेब्रुवारी रोजी दिवसभरात १७४ जणांनी लसीकरण करून घेतले.

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. दिवसभरात पोलीस, डॉक्टर्ससह आरोग्य यंत्रणेतील १७४ जणांनी लस घेण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. यात १४० जणांनी पहिल्यांदा तर ३४ जणांनी ३० दिवस झाल्यावर दुसरी लस घेतली आहे. गुरुवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दुसरा डोस घेऊन लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबले.

कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन हि भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत २ हजार ५ जणांनी “शावैम” मध्ये लसीचा पहिला तर १४९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, कर्मचारी नितीन राठोड, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, अभिषेक पवार, विश्वजीत चौधरी यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.

Share post
Tags: JalgaonMarathi NewsVaccineशावैम' मध्ये ३४ जणांनी घेतला कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस
Previous Post

जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Next Post

जिल्ह्यात आज १६९ रुग्ण कोरोनाबाधित, ५५ बरे झाले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज १६९ रुग्ण कोरोनाबाधित, ५५ बरे झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group