Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुणी पक्षातून गेल्याने काहीही परिणाम होणार नाही- महाजन

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in जळगाव, राजकीय
0
कुणी पक्षातून गेल्याने काहीही परिणाम होणार नाही- महाजन

जळगाव- भाजप पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीनंतर माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी मत व्यक्त केले आहे की, “भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचा दावा आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला.

एकनाथराव खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपच्या कोअर समितीची बैठक पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणीक व माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी ते म्हणाले की, भाजपची आजची बैठक ही नियमीत या प्रकारातील असून कार्यकारिणीची निवड करण्यासाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे.

याप्रसंगी त्यांना पत्रकारांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचे ते म्हणाले.

तसेच आजच्या कोअर समितीच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे यांनी अनुपस्थिती दर्शविल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, रक्षाताई या दिल्ली येथे महत्वाची बैठक असल्याने आज गैरहजर होत्या. त्यांनी याबाबत आधीच अधिकृत परवानगी घेतलेली आहे. दोन दिवसानंतर त्या पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर मराठा आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पायांच्या शर्यतीसारखे असल्याचा टोला त्यांनी मारला.

Share post
Tags: BjP NewsGirish Mahajan NewsGirish Mahajan StatementJalgaon newsMarathi NewsPolitical News
Previous Post

भाजप कोअर समितीच्या बैठकीला प्रारंभ

Next Post

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळावर दिलीप वैद्य

Next Post
jalgaon news

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळावर दिलीप वैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group