यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील चुंचाळे गावातुन मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली चोरून नेल्याची घटना घडली असुन संबधीत ट्रॉली मालक हे यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी आले आहेत.
तालुक्यातील चुंचाळे या गावातील रहिवाशी व चुंचाळे ग्राम पंचायतीचे सदस्य सुकलाल यशवंत पाटील यांची सुमारे दोन लाख रुपये किमती निळ्या रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एमएच १९बी क्यु००९२हे आज दिनांक १७ / ०२ / २०२१च्या रात्री २ वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालया समोरून चोरून नेल्याची घटना घडली असुन , याबाबतची फिर्याद यावल पोलीस स्टेशनला ट्रॉली मालक सुकलाल यशवंत पाटील यांच्याकडुन देण्यात आली असुन त्या अज्ञान चोरट्यांविरूद्ध पोलीसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपासपोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.