यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील बु्ऱ्हाणपुर ते अकंलेश्र्वर राज्य मार्गावरील यावल ते किनगाव रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन या मार्गावरील रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे .
या मार्गावरील मागील दोन वर्षात झालेल्या रस्त्यावरील विविध अपघातामध्ये २२ निरपराध लोकांचा अपघातात बळी गेला असुन , वारंवार या मार्गावर होणाऱ्या अपघाता संदर्भात यावलच्या निष्क्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास स्थानिक पातळीवर समाजसेवी संघटना व राजकीय पक्षांच्या माध्यमातुन अनेक निवेदन देवुन देखील काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसुन आले नसुन, सार्वजानिक बांधकाम विभागाच्या या अंधेर नगरी चौपट राजा अशा कारभारा विषयी सर्वसामान्य नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
दरम्यान यावल ते किनगाव या मार्गावरील १३ किलोमिटरच्या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन , यामुळे वाहनचालकांना वाहने चालवितांना वाहनधारका तारेवरची कसरत करावी लागते , प्रसंगी वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघातास सामोरे जावे लागते , यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत आणी निष्क्रीय कारभाराच या आजपर्यंत झालेले अपघात आणी त्यात मरण पावलेले लोकांच्या मृत्युस जबाबदार असल्याची संत्पत प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे . आता तरी लोकप्रतिनिधींनी यावलच्या निंद्र अवस्थेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास बाहेर आणावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .