पाचोरा (अनिल येवले) – तालुक्यातील लोहटार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा संजय वाणी तसेच उपसरपंचपदी योगेश शिवराम माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यासी अधिकारी समाधान शिवराम पाटील व ग्रामसेवक गोरडे तसेच तलाठी सौ.पाटील यांच्या उपस्थित ही निवड शांततेत पार पडली.
या निवडणूकीच्या वेळी सरपंच व उपसरपंच निवडीसाठी पॅनल प्रमुख सुभाष तुकाराम पाटील ( माजी सभापती पंचायत समिती पाचोरा) तसेच मंगल परदेशी ,राजेंद्र परदेशी, देवचंद परदेशी, रोहिदास मांडोळे, तुळशीराम माळी, शिवाजी पाटील, सरदार परदेशी,सुनील कोळी हे होते. तसेच यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.