Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इन्फोसिस कंपनीच्या अभियंत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

by Divya Jalgaon Team
February 13, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
इन्फोसिस कंपनीच्या अभियंत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

पिंपरी, वृत्तसंस्था : इन्फोसिस कंपनीच्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी आयटी पार्क फेज दोन येथे इन्फोसिस कंपनीच्या एम्प्लॉय केअर सेंटरमधील बाथरूममध्ये हा प्रकार उघडकीस आला.

रणजितसिंग किसनसिंग राठोड (वय २२), असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. कर्नल योगेश बाळकृष्ण जोशी (रा. औंध) यांनी खबर दिल्यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता असलेला रणजितसिंग राठोड हा इन्फोसिस कंपनीत नोकरीला होता. कंपनीच्या एम्प्लॉय केअर सेंटरमध्ये तो राहायला होता.

गुरुवारी (दि. ११) त्याने तेथील बाथरुममध्ये टाॅवेलच्या साह्याने गळफास घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कर्नल जोशी यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राठोड याचे मित्र, कंपनीतील डॉक्टर व कर्मचारी यांच्या मदतीने पोलिसांनी राठोड याला बेशुद्धावस्थेत खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे तपास करीत आहेत.

Share post
Tags: Marathi NewsPuneSuicide Newsइन्फोसिस कंपनीच्या अभियंत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
Previous Post

यावल – चोपडा रोडवर अपघातात जखमी झालेले हमीद मिस्त्री यांचा मृत्यू

Next Post

5 व्या दिवसांत पेट्रोल, डिझेल दीड रूपयानी ‘महाग’

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

5 व्या दिवसांत पेट्रोल, डिझेल दीड रूपयानी 'महाग'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group